क्रिकेटर Suresh Raina हे दिसणार नव्या भूमिकेत | Lokmat News Update | Lokmat Marathi News

2021-09-13 0

एखाद्या क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी आग्रही असणाऱ्या बऱ्याच मंडळींना इतरही विविध गोष्टींमध्ये रस असतो. क्रिकेटर सुरेश रैना अशाच काही मंडळींपैकी एक आहे. क्रिकेटच्या मैदानात अफलातून फटकेबाजी आणि मोठ्या चपळाईने फिल्डिंग करणारा सुरेश रैना आता चक्क एका गायकाच्या भूमिकेत सर्वांसमोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचा हा व्हिडिओ बराच चर्चेत आला असून हरभजन सिंग, इरफान पठान या खेळाडूंनीसुद्धा सुरेशचे तोंड भरुन कौतुक केले आहे.‘बिटिया रानी’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात मुलींचं महत्त्व, त्यांचं समाजातील आणि सर्वांच्याच आयुष्यातील स्थान या गोष्टींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सुरेश रैनाने गायलेल्या गाण्याची व्हिडिओ लिंक ट्विटरवरुन शेअर करत इरफान पठानने लक्षवेधी ट्विट केलं. ‘महिला आपल्या समाजाच्या, देशाच्या आणि कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत’, असं इरफानने म्हटलं.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires